Pune Crime | लोणी काळभोर, (पुणे) : वाडेबोल्हाई व अष्टापूर फाटा परिसरात दहशत निर्माण करणारा अट्टल गुन्हेगार सुनिल भोर याला जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिली आहे.
सुनिल पोपट भोर (वय २५, रा. वाडेगाव नाहेरवस्ती, वाडेबोल्हाई ता. हवेली जि.पुणे) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी कंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल भोर हा वाडेबोल्हाई व अष्टापूर फाटा दहशत निर्माण करीत होता. आरोपीच्या कृत्यामुळे नागरीकांमध्ये कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.
सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी आरोपीवरील दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे तडीपार करण्यासाठी पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला होता. पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे यांनी आरोपीला २ वर्षाकरीता पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडू, बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, किरण पड्याळ, अमोल ढोणे. साई रोकडे, दिपक कोकरे, विजय आवाळे यांच्या पथकाने केली आहे.