Pune Crime पुणे : सोन्याची २ कोटी ९७ लाख रुपयांच्या तस्करी प्रकरणातील २ परदेशी महिलांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी साहेबांच्या कोर्टाने जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहेत.
रागा अडम व सवाकीन असे जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार…!
२१ फेब्रुवारीला रागा आणि सवाकिन ह्या दोघी सुदान वरून विमानाने हैद्राबाद येथील विमानतळावर आल्या व तेथून पुढे मुंबई कडे जाण्यासाठी ऑरेंज ट्रॅव्हल्स द्वारे पुणे मार्गे मुंबई ला जात होत्या. यावेळी महसूल गुप्तचर संचनालयच्या अधिकाऱ्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, दोन परदेशी महिला या सोने तस्करी करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर अधिकाऱ्यांनी सदर बस पुणे येथे बालेवाडी परिसरात बस थांबवून महिला अरोपी याना डी. आर. आय. च्या मध्यवर्ती कार्यालयात घेऊन जाऊन तपास केला. यावेळी सदर दोन्ही आरोपींच्या बुरख्याच्या आत २ कोटी ९७ लाख किमतीचे सोने आढळून आल्याने दोन्ही महिलांना कस्टम ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले होते. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना येरवडा महिला कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले होते.
आरोपी महिलांनी अॅड. नितीन भालेराव यांच्यामार्फत जामीन मिळणे कामी अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या विरुद्ध तपासी अधिकाऱ्यांनी विधीत वेळेमध्ये तपास पूर्ण करून दोषरोप पत्र न्यायालयात हजर न केल्यामुळे सदर आरोपींना जामीन मिळणेत यावा अशी बाजू आरोपींच्या वतीने मांडण्यात आली होती.
दरम्यान, सदर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून मुख्य न्यायदंडाधिकारी सौ. सचदेव यांनी दोन्ही महिला आरोपींना जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केल्याची माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी दिली आहे. सदर कामी अॅड. मयूर चौधरी, यांनी मदत केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!