Pune Bribe News पुणे : गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करून त्यातील १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता.२) रंगेहाथ पकडले आहे. (Pune Bribe News)
शंकर धोंडीबा कुंभारे (वय ४३, पोलीस उपनिरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ५० वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. (Pune Bribe News)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याविरुद्धच्या तक्रारी अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक शंकर कुंभारे हे करत होते. या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी शंकर कुमार यांनी ५० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. (Pune Bribe News)
याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी पोलीस उपनिरीक्षक शंकर कुंभारे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करत आहेत. (Pune Bribe News)
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. (Pune Bribe News)