Pune Accident | पुणे : मुंबई – बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे खासगी बस व ट्रकचा झालेल्या अपघातात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
अघताबाबात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा करणार…
नवले पूलावर सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे आता पर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यामार्गावर अपघात होणार नाहीत, अशा उपाय योजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जाते. त्यामुळे आता नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सुळे यांनी स्वामी नारायण मंदिर परिसरात ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा अपघात झालेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलल्या.
या मार्गावर मागील चार महिन्यांपूर्वीदेखील अपघात झाला होता. या मार्गावर अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आपल्याला आणखी काय करता येईल याबाबत प्रशासनाने अहवाल द्यावा, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा करणार, असेही त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर, वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता आपण सर्वांनी रोड सेफ्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही सुळे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Political | आमच्या मनातील मुख्यमंत्री… राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले
Panchgani Police | पाचगणी पोलिसांनी गुलाब पुष्पांचे वाटप करत दिल्या ईदच्या शुभेच्छा..!