Thursday, April 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political | आमच्या मनातील मुख्यमंत्री… राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 23 April 2023, 12:30

Political | पुणे :  राष्ट्रवादीचे नेते आणि विरोध पक्ष नेते अजित पवार हे सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. अजित पवारांनी केलेल्या एका एका वाक्यावर आता बातमी होत आहे. तसेच राजकारण रंगत आहे. अजित पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चा अजून काही थांबण्याचे नाव घेईनात. असे असतानाच त्यांनी थेट मुख्यमंत्री आता लगेच होयला आवडेल असे वक्तव्य केल्याने पुन्हा त्यावर राजकीय चर्चा होत आहेत. त्यावर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे अवघ्या महाराष्ट्राला संभ्रमात टाकतात. पण, या वेळी अजित पवार यांनी स्वत: शरद पवार यांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्याच मनाचा तळ लागत नाही. कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही. यावर तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण ? असा प्रश्न विखे पाटील यांना विचारण्यात आला.

त्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, ” राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्कीच चांगले नेते आहेत. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असे उत्तर दिले. त्यामुळे खरा मुख्यमंत्री कोण ? या चर्चेला आता उधान आले आहे. भाजपच्या नेत्यांकडून वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात असल्याने मुख्यमंत्री पदावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत कलह आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

शिर्डीमध्ये राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

भाजपाकडुन याआधीही चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यांनी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे विधान केले आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोची झाली आहे. अद्याप शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

शिंदे गटाला तोंड दाबून बुक्यांचा मार…

राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरीही भाजपाकडुन मात्र सातत्याने आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे सांगून शिंदेंची कोंडी करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून राजकीय घमासान सुरु असताना भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मानत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.

राज्यातील युती सरकारचे नेतृत्व शिंदे करत असले तरी फडणवीस यांच्याकडेच या सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. याचदरम्यान, भाजपच्या नेत्याकडून मुख्यमंत्रीपदावरुन सातत्याने विधाने केली जात आहेत. यामुळे भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पण यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वाढली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंड येथे पत्नीचा गळा वायरने आवळून खुनाचा प्रयत्न ; आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Thursday, 30 April 2026, 16:45

Pune News : “शिवाजी कोण होता” पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, प्रशांत आंबी यांच्यावर गुन्हा दाखल करावा ; छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या वंशजांकडून पुण्यात मागणी..

Thursday, 30 April 2026, 16:11

Loni Kalbhor : ‘अजित मल्टीस्टेट’ सोसायटीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! कर्जदार, जामीनदार सोडून निरपराध शेतकऱ्याच्या घर-जमिनीवर चढवला २४ लाखांचा बोजा? लोणी काळभोर येथील धक्कादायक प्रकार

Thursday, 30 April 2026, 14:50

Baramati News : बारामतीत भररस्त्यातून तरुणाचे अपहरण; ‘पत्नीला अपशब्द वापरल्याचा’ आरोप करत टोळीचा धुमाकूळ ; मुख्य आरोपीला अटक

Thursday, 30 April 2026, 14:14

Indapur Succide News : वरकुटेत सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल..

Thursday, 30 April 2026, 14:08

Pratap Sarnaik : ‘बसस्थानकांवर ‘नाथजल’ पाण्याची बाटली 15 रुपयांतच द्या, अन्यथा परवाना रद्द – प्रताप सरनाईक यांचा इशारा

Thursday, 30 April 2026, 13:17
Next Post

Pune Accident | ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असावा - सुप्रिया सुळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.