Pune Accident | दौंड, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील मळद (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत खासगी आराम बस व चारचाकी गाडीचा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये चारचाकी गाडी हि दीडशे फूट खोल खडकवासला कालव्याच्या बोगद्यात पडल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. हि घटना बुधवारी (ता. २४) मध्यरात्री घडली आहे.
बलवंत विश्वनाथ तेलंगे (वय-३५, सध्या रा. भोसरी, पुणे. मूळ रा. सोमनाथपूर, ता. उद्गगीर, जि. लातूर) व नामदेव जिवन वाघमारे (वय-१८, रा. भोसरी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. मृत्यू झालेल्या दोघांचे एकमेकांचे दाजी मेव्हणे असे नाते आहे.
चारचाकीवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला…
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून बुधवारी मध्यरात्री चारचाकी गाडीतून बलवंत तेलंगे व नामदेव वाघमारे हे दोघे पुण्याहून गावाकडे चालले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरुन लातूरच्या दिशेने निघाले असताना मळद हद्दीत खाजगी आरामदायी बसने चारचाकी गाडीला धडक दिली. यामुळे चारचाकीवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी दीडशे फूट खोल खडकवासला कालव्याच्या पाण्यात कोसळली.
दरम्यान, या अपघातात चारचाकी गाडीतील बलवंत तेलंगे व नामदेव वाघमारे या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Mehkar ST Accident : पुणे मेहकर एसटी अपघात; मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये
Aakurdi Accident : वाहनचालकाचा निष्काळजीपणा बेतला चिमुकल्याच्या जीवावर