धनकवडी : प्रियसीने घरातील दागिने व दुकानातील रोख रक्कम घेऊन प्रियकराबरोबर धूम ठोकल्याची धक्कादायक घटना धनकवडी येथील बालाजीनगर घडली आहे. याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी वीस वर्षीय मुलगी आणि तिचा प्रियकर विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार अजिज मोहमंद शेख (वय २४, रा. बालाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बालाजीनगर येथे फोटो स्टुडिओ आहे. सोमवारी ते एका लग्न समारंभासाठी गेले असता, त्यांच्या पत्नीने मुलगी बालाजीनगर परिसरात राहत असलेल्या तरुणाबरोबर निघून गेली असल्याचे सांगितले.
दरम्यान, तक्रारदार घरी आले व त्यांनी मुलीची परिसरात शोधाशोध घेतली. मात्र त्यांना मुलगी आढळून आली नाही. त्यानंतर तक्रारदार दुकानात आले असता, त्यांना दुकानातील रोख रक्कम आणि घरातील दागिने असा तब्बल पाच लाख एकोणतीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तरुणीच्या वडीलांनी सहकारनगर पोलीस तक्रार दिली. त्यानुसार मुलीसह तिच्या प्रियकराविरुद्ध चोरीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.