पुणे : एका १६ वर्षीय मुलाने मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी येथील परिसरात घडली. याप्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करून हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांनी त्यांची जर्सी जातीची गाय त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत गवत खाण्यासाठी बांधली होती. मंगळवारी (ता. १३ ) पहाटे साडेचारच्या सुमारास अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या गायीचे पाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचाक केला.
दरम्यान हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन सोळा वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.