पुणे : सहाय्यक पोलीस निरीक्षक असल्याची खोटी बतावणी करून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला धमकी देवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतयाला गुन्हे शाखा युनिट क्र ३ च्या पोलिसांनी अटक केली आहे.
शुभम अशोक माने (वय-२२, सध्या रा. सुंदर अपार्टमेन्ट, फ्लॅट नं-४१०, पारिजात बंगल्या समोर, मागडेवाडी, कात्रज. मूळ रा. फ्लॅट नं-४, भवानी पार्क बिल्डींग, मंदार सोसायटी, सर्व्हे नं-१, शेवटचा बस स्टॅप, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट क्र ३ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम माने याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला धमकी देवून आर्थिक फसवणूक केली होती. याप्रकरणी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्र ३ चे पोलीस करीत असताना, पथकातील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांनी घटनास्थळाचे परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. फुटेज मध्ये आरोपी हा काळे रंगाच्या टि. व्ही. एस. ज्युपीटर आढळून आला. आणि पोलिसांनी फुटेज गाडीचा नंबर मिळाला. त्यानुसार सदरची गाडी ही भारती माने (रा. सर्व्हे नं- भवानी पार्क, बिल्डींग-मंदार सोसायटी, फ्लॅट नं-४. धनकवडी, शेवटचा बस स्टैंप) या महिलेची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस आरोपीला पकडण्यासाठी सदर ठिकाणी गेले होते. त्यावेळी पोलिसांना सी.सी.टी.व्ही. फुटेज मधील वर्णनाचा व्यक्ती गाडीवरून जात असताना आढळून आला. पोलिसांनी आरोपीच्या गाडीला आडवी गाडी लावून थांबविले. आणि आरोपी शुभम मानेला ताब्यात घेतले. तसेच गुन्हा करतानावेळी गाडी वापरली असल्याने सदरची गाडी गुन्ह्याच्या पुरावेकामी जप्त केली आहे.
हि कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्र ३ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षिरसागर, पोलीस अमलदार रामदास गोणते, शरद वाकसे, सुजित पवार, संजीव कळते. सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रताप पडवाळ, सतिश काळे, राकेश टेकावडे, साईनाथ पाटील आणि गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे.