Police News हडपसर : शेवाळेवाडी (ता. हवेली) येथील मिठाईचे दुकान फोडून पडून जाणाऱ्या आरोपींचा तब्बल ६ किलोमीटर पाठलाग करून एका अल्पवयीन आरोपीला पकडणाऱ्या (Police News) हडपसर पोलिस ठाण्यातील पोलीस अंमलदार विजयकुमार ढाकणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Police News)
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार ढाकणे हे हडपसर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ढाकणे हे शेवाळेवाडी परिसरात रविवारी (ता.२५) कर्त्यव्य बजावीत होते. दरम्यान, शेवाळवाडी चौक येथील चैतन्य स्वीट अँड सेंटर या मिठाईच्या दुकानातील सर्व काचेची कपाटे, फ्रिज हे तीन इसमांनी लोखंडी कु-हाडीने तोडफोड केली होती. व त्यातील दोघे मोटरसायकल वर पळून जात असल्याचे पोलीस अंमलदार ढाकणे यांना दिसले.
पोलीस अंमलदार ढाकणे यांनी सदर गुन्ह्याची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. आणि ढाकणे यांनी दुचाकीवरून चाललेल्या दोन्ही आरोपींचा पाठलाग करण्यास सुरवात केली. ढाकणे यांनी साधारण आरोपींचा ६ किलो मिटर पाठलाग केला. या पाठलागादरम्यान आरोपी मोटरसायकलवरून खाली घसरून पडले. आणि उसाच्या शेतात पळून गेले.
दरम्यान, हडपसर पोलीस ठाण्याच्या व्हाट्स ॲप ग्रुप वर या घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसां उसात लपलेल्या एका १७ वर्षाच्या विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी गुन्हयात वापरलेली हिरो होंडा प्लस कंपनीची मोटार सायकल (गाडी क्रमांक MH-12-PU-6265 ताब्यात घेतली आहे. तर दुसरा आरोपी गौरव संतोष अडसूळ (वय-१९,राहणार कॉलनी नंबर 5 मोरे सोसायटीच्या समोर शेवाळवाडी) हा व अजून एक विधी संघर्षित बालक पळून गेले आहे. हडपसर पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.
हडपसर पोलिस ठाण्यातील पोलीस अंमलदार विजयकुमार ढाकणे यांनी दाखविलेल्या कर्त्यव्य दक्षतेमुळे एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. ढाकणे यांनी जीवाची बाजी लावून कर्त्यव्य पार पाडले आहे. म्हणून मांजरी आणि शेवाळवाडी या दोन्ही गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, व्यापारी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अंमलदार विजयकुमार ढाकणे यांचा सत्कार केला. व नागरिकांनी हडपसर पोलिसांचे कौतुक केले.