पुणे : जामीन मिळवून देण्यासाठी आरोपीकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (ता.१३) कोथरुडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात रंगेहाथ पकडले आहे.
विजय एकनाथ शिंदे ( वय ४८) असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीच्या विरोधात दाखल असलेल्या एका प्रकरणात त्याला हजर करुन घेणे तसेच त्याला जामीन मिळवून देण्यासाठी हवालदार शिंदे यांनी पाच हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोथरुडच्या सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात सापळा रचला. तेव्हा संशयित आरोपीकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
दरम्यान, पोलीस हवालदा विजय शिंदे यांच्या विरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच कोथरूड पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. तरी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.