Pimpri News : पिंपरी-चिंचवड : जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला आळा बसवण्यासाठी राज्य सरकारने धर्मांतर प्रतिबंध कायदा करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच, पिंपरी-चिंचवड परिसरातील रहाटणी येथील एका महिलेला बायबल वाचा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा… असे म्हणत धर्मांतर करण्याचा प्रयत्न तीन महिलांनी केल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रहाटणी येथील घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथे धर्मांतराबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न तीन महिलांनी केला आहे. बायबल वाचा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, असे म्हणून ३९ वर्षीय तक्रारदार महिलेला विश्वासात घेऊन धर्मांतर करण्याचा प्रयत्न या तीन महिलांनी केला. (Pimpri News) याप्रकरणी वाकड पोलिसांनी तीनही महिलांना नोटीस बजावत समज दिली आहे.
महाराष्ट्रात मुलींची फसवणूक करून, त्यांना प्रलोभनं देऊन बळजबरीने त्यांना दुसरा धर्म स्वीकारण्यास म्हणजेच त्यांचे धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचे अनेक प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.(Pimpri News) याच आधारावर धर्मांतरविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू करावा, अशी मागणी जोर धरत आहे. असे असताना रहाटणीमध्ये असा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होत आहे.
तक्रारदार व्यक्तीच्या घरी तीन महिला वारंवार जात होत्या. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, असे म्हणून त्यांना बायबल वाचून दाखवत होत्या. याबाबत तक्रारदार महिलेने यामध्ये आम्हाला रस नसल्याचे वारंवार सांगितले. (Pimpri News) तरिही सोमवारी तीनही महिला तक्रारदार महिलेच्या घरात शिरल्या आणि जबरदस्तीने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास सांगून मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागल्या.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तक्रारदार महिलेने अखेर नातेवाईकाला बोलावून महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तरीही त्या महिला जात नसल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. (Pimpri News) धर्माबद्दल मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीनही महिलांना वाकड पोलिसांनी नोटीस बजावत समज दिली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गॅंगची दहशत; दुकानात घुसून व्यापाऱ्यावर हल्ला!