Pimpri News : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात सायबर चोरींच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. शहरातून सायबर चोरीच्या अनेक घटना समोर येत आहे. अशीच एकच घटना चिंचवड येथून आली आहे. एका महिलेला वर्क फ्रॉम होम काम करण्यासाठी डेटा विकत घ्यायचे सांगत तिची तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 9 ते 14 एप्रिल या कालावधीत लिंक रोड, चिंचवड येथे घडला.
चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
याप्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pimpri News) त्यावरून मेरीकॉर व शगुन, 91574186363 मोबाईल धारक, सात बँक खाते धारक आणि एक फोन पे धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना वर्क फ्रॉम होम करण्यासाठी थोडी रक्कम भरून डेटा विकत घेण्यास सांगितले. (Pimpri News) ऑनलाईन ऑर्डर पूर्ण केल्यास चांगली रक्कम मिळेल असे आमिष दाखवून वारंवार डेटा विकत घेण्याचा बहाणा करून सात लाख 50 हजार 736 रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : टेलिग्रामवरील बनावट खात्यावरून तब्बल साडेसहा लाखांना घातला गंडा
Pimpri News : पिंपरी-चिंचवड : भरधाव कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा मृत्यू..
Pimpri News : फसवणुकीचा नवा फंडा; ‘टास्क फ्रॉड’मधून महिलेला घातला तब्बल 88 लाखांचा गंडा