Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Aadhar Card : आता ‘आधार कार्ड’ अपडेट करा अगदी मोफत ; यूआयडीएआयने वाढवली मुदत..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 23 June 2023, 16:43

Aadhar Card : नवी दिल्ली : आधार कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आधार कार्ड काढून दहा वर्षे पूर्ण झालेल्या कार्डधारकांना आता आणखी तीन महिने त्यांचे आधार मोफत अपडेट करता येणार आहे. यापूर्वी १४ जूनपर्यंत आधार अपडेट करण्याची मुदत होती. यावर्षी मार्च महिन्यापासून ही सवलत देण्यात आली होती. (Aadhar Card)

पण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मुदत वाढ दिली आहे. आता नागरिकांना १४ सप्टेंबर, २०२३ रोजीपर्यंत आधार कार्ड अपडेट करता येईल. आधार कार्डला १० वर्षे पूर्ण झाले असेल तर नागरिकांनी आधारमधील पत्ता आणि डेमोग्राफिक पशील अपडेट करणे आवश्यक आहे. ही पद्धत अत्यंत सोपी आहे. (Aadhar Card)

अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्डची गरज पडते. आधार हा अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला १० वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार अपडेट मोफत करता येते. (Aadhar Card)

 

आधार कार्ड अपडेट myAadhaar पोर्टलवर करता येते. ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डमधील माहिती अद्ययावत करता येईल. येत्या १५ मार्च ते १४ जून २०२३ रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. १४ सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. (Aadhar Card)

आधार कार्डमधील माहिती अपडेट किती वेळा करता येते, असा सर्वांनाच प्रश्न पडतो. त्यासंबंधी काही नियम आहेत. त्यानुसार, नागरिकांच्या नावात दोनदा बदल करता येतो. तर जन्मतारीख आणि लिंगामध्ये एकदाच बदल करता येतो. आधार कार्ड तयार करताना आणि माहिती भरताना काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. (Aadhar Card)

असे करा आधार कार्ड अपडेट
-https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा
अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/यावर लॉगिन करा
– 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा.
– ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा.
– आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल.
– ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा.
-‘प्रोसीड टू अपडेट आधार’हा पर्याय निवडा, माहिती भरा.

आधार कार्डमध्ये ऑनलाईन बदल करणे शक्य आहे.

– ओळखपत्र स्कॅन करुन नावात बदल करता येईल.
– जन्मदाखला स्कॅन करुन जन्मतारीख अद्ययावत करा.
– लिंग बदल करण्यासाठी तुमचे ओळखपत्र पुरेसे आहे.
– ऑनलाइन SSUP पोर्टल, मोबाईल ॲपच्या सहायाने भाषा बदलता येते.
– सध्या SSUP पोर्टलवर एकूण १३ भाषा आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Sad News : मनोरंजन विश्वावर शोककळा; चित्रपट दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.