पुणे : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चौघांकडून खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी ०५ पिस्टल व १० जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
अस्लम अहमद शेख (रा. पवार गल्ली नं. ०५, थेरगाव, पुणे), सचिन उत्तम महाजन (रा. मु. पो. सुरवड, ता. इंदापूर) संतोष विनायक नातु (रा. ३४५ महर्षीनगर झांबरे पॅलेसजवळ चिंतामणी बिल्डींग, स्वारगेट), राहुल ऊर्फ खंडु गणपत ढवळे (रा. विठ्ठल मंदीराजवळ मु. पो. पिंपळगाव ता. दौंड) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे ०५ पिस्टल व १० जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत खंडणी विरोधी पथक गस्त घालीत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस हवालदार गणेश गिरीगोसावी व विजय नलगे यांना एका खबऱ्याने माहिती दिली कि, एक इसम जगताप डेअरी चौक, साई मंदीरासमोर, ब्रिजचे खाली, रहाटणी, पुणे येथे थांबलेले असुन, त्याचे जवळ पिस्टल सारखे हत्यार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंगलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून, अस्लम शेख याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे झडती घेतली असता त्याच्याकडे ०१ देशी बनावटीचे पिस्टल जप्त करून गुन्हा दाखल केला. सदर गुह्याच्या अनुशंघाने तपासादरम्यान पिस्टल विक्री करणारे वरील आरोपी यांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे ०४ पिस्टल व १० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून आता पर्यंत २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे ०५ देशी बनावटीचे पिस्टल व १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे रमेश गायकवाड हे करीत आहेत.
दरम्यान आरोपी सचिन महाजन, संतोष नातु व राहुल ढवळे हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द पुणे शहर, पुणे ग्रामीण व सोलापूर येथे दरोडा, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण, जबरी चोरी, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहे. आरोपी सचिन महाजन याचेवर मोका अंतर्गत पुणे ग्रामीण येथे कारवाई झालेली आहे. तसेच आरोपी संतोष नातु याचेवर पुणे शहर येथे तडीपार कारवाई करण्यात आली होती.
सदरची कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, पोलीस उप- निरीक्षक रमेश गायकवाड, अमर राऊत, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, प्रदीप गायकवाड, शैलेश मगर, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुन्हाडे, सुधीर डोळस प्रदीप गुट्टे व भरत गाडे यांचे पथकाने केली आहे.