भोसरी : बॅंकेत खोटे प्रतिज्ञापत्र तसेच कागदपत्रे दाखवत चार लाख रुपयांची एफडी काढून घेतल्याचा प्रकार भोसरी येथून समोर आला आहे. मृत व्यक्तीच्या बॅक खात्यावरून आपणच ही व्यक्ती असल्याचे खोटी कागद पत्र दाखवत ही फसणवूक करण्यात आली आहे. दरम्यान या मृत व्यक्तीची पत्नी बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. (Bank fraud by showing fake document of dead person in Bhosari)
महिलेने बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेल्यावर पतीचा मृत्यू झाल्याने आपण पैसे काढण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यानंतर बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हा प्रकार १८ नोव्हेंबर २०२१ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत घडला आहे.
मृताची पत्नी बॅंकेत पैसे काढण्यासाठी गेल्यावर उघडकीस आला प्रकार
याप्रकरणी राहुल चंद्रकांत नाईक (वय ५५, रा.वारजे नाका) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून रमाशंकर बाबूराम विश्वकर्मा (रा. दिघी) यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी याने तक्रारदार यांना खोटी कागदपत्रे सादर करून तसेच खोटे प्रतिज्ञापत्र देवून नाव साधर्म्य असलेल्या बँकेच्या दुसऱ्या मयत रमाशंकर जे. विश्वकर्मा यांच्या नावावर असलेली मुदत ठेव व रिकरिंग खात्यावरून चार लाख ३१ हजार ७७१ फसवणुकीने काढून घेतले. आरोपीने आपल्याकडील ठेवीच्या पावत्या हरवल्याचे त्याच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. हे पैसे काढल्यानंतर मूळ खातेदार रमाशंकर जे. विश्वकर्मा यांच्या पत्नी बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या तेव्हा बँकेतून पैसे आधीच कोणीतरी काढल्याचे त्यांना समजले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri Crime : धक्कादायक! मित्रानेच केला पिंपरीतील सोन्या तापकीरचा खून
Bhosari crime : सोने म्हणून दिली पिवळ्या रंगाच्या धातूची बिस्किटे; ६५ वर्षीय महिलेची फसवणूक