Pimpri Crime पिंपरी, (पुणे) : साखरपुडा झाल्यानंतर तरुणाने होणाऱ्या बायकोला तिच्या मनाविरुद्ध महाबळेश्वर येथे नेऊन लैंगिक अत्याचार केला तसेच तिच्याजवळ असलेली सुमारे ५ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना पिंपरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी बापलेकाविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कुणाल संतोष चौधरी आणि संतोष चौधरी (दोघेही, रा. पिंपरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी एका २२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
कुणाल चौधरी आणि फिर्यादी यांचा २ एप्रिल २०२२ रोजी साखरपुडा झाला. यानंतर आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने महाबळेश्वर येथे फिरायला नेले. त्यानंतर तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर आरोपी आणि त्याचे वडील संतोष चौधरी यांनी तिचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये घेतलेले पैसे फेडण्याकरता कर्ज काढायला लावले. त्यानंतर पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथील फिर्यादीच्या घरून सुमारे ५ लाख २२ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेऊन फिर्यादीची फसवणूक केली.
दरम्यान, पैसे परत न करता किरकोळ कारणावरुन तिच्याशी भांडणे करण्यास सुरुवात केली. तिच्यावर संशय घेत तुझ्याकडून फक्त पैसे घेण्याकरिता लग्न जमावले होते, असे सांगत आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, परत जर पैसे मागायला आलीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी देत फसवणूक केली आहे. यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत आरोपी बाप लेकविरोधत फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दखल केला असून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime : क्रिकेट खेळताना वाद; मैदानावर बॅटने तरुणावर प्राणघातक हल्ला; हिंजवडीतील घटना
Pimpri Crime : पुनावळे येथील चार दुकाने चोरट्यांनी फोडली ! रोख रक्कम तसेच चांदीचे नाणी केली लंपास