Pimpari Crime | पिंपरी : सलूनमध्ये चेहरा फ्रेश केल्यानंतर कामाचे २० रुपये मागितले म्हणून सलून चालकाला बेदम मारहाण करून दुकानाची काच फोडणाऱ्याला चिखली (Pimpari Crime) पोलिसांनी अटक केली आहे.
आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय-२२ रा.चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार आदित्य शिंदे (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भुषण लक्ष्मीकांत महाले (वय-२६ रा.चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुषण महाले यांचे चिखलीत ट्रेंडस सलून नावाने दुकान आहे. महाले हे मंगळवारी (ता.२१) सायंकाळच्या सुमारास काम करीत असताना, दोन्ही आरोपी त्यांच्या सलूनमध्ये आले. आणि दोघांनीही चेहरा फ्रेश करून देण्यास सांगितला. त्यानंतर फिर्यादी महाले यांनी दोघांचाही चेहरा फ्रेश करून दिला व कामाचे २० रुपये मागीतले.
लोखंडी पाईपने सलूनच्या काचा फोडल्या…
दरम्यान, पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपी फिर्यादीला म्हणाले की, तु माझ्याकडे पैसे मागतोस, तु आम्हाला ओळखत नाही का, थांब तुला दाखवतो असे म्हणून फिर्यादिला मारहाण केली. तसेच बाहेर जाऊन लोखंडी पाईपने सलूनच्या काचा फोडल्या व सामानाची नासधुस केली.
याप्रकरणी भुषण महाले यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी आदर्श उर्फ मोन्या लुडेकर याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Vishrantwadi Crime | चोरट्याने फोडली पोलिसांचीच घरे ; येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल