पुणे : शेअर ट्रेडिंग प्रकरणात ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण करत मारहाण केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी कुख्यात गुंड गज्या मारणेला सातारा येथून अटक केली होती. याच प्रकरणातील फरार असलेला गुंड रुपेश मारणे आणि संतोष शेलार या दोघांना पुणे शहर पोलिसांनी मुळशीतून अटक केली आहे.
हि कामगिरी सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर व त्यांच्या पथकाची कामगिरी केली आहे. यामुळे पुणे शहर पोलिसांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर ट्रेडिंग प्रकरणात व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १५ जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाई केली. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही मोक्का कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर सातारा येथून गज्या मारणे याला पोलिसांनी अटक केली असली तरी रुपेश मारणे व त्याचे साथीदार फरार होते.
या प्रकरणात सध्या तीन ते चार गुंडांची धरपकड करण्यात आली असली तरी अजून देखील अनेक गुन्हेगार फरार आहेत.