सुरेश घाडगे
Paranda Nwes : परंडा : परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आठ सदस्य व इतर चार अशा बारा जणांचे भिमानगर (ता.माढा) येथून पिस्तुल,कोयत्याचा धाक दाखवून त्यांना लोखंडी रॉड, कुकरी व लाकडी दांडक्याने मारहाण करून बुधवारी (दि.२६) सकाळी अपहरण केले होते. या प्रकरणातील ४ दिवस पोलीस कोठडीत असलेल्या सुरेश उर्फ सुर्यकांत कांबळे यांच्यासह ७ आरोपींची माढा न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच एकच खळबळ उडाली होती. (Bail granted to seven accused in the kidnapping case of Paranda Agricultural Produce Market Committee Director in Bhimanagar)
पिस्तुल,कोयत्याचा धाक दाखवून केले होते अपहरण
पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत चोवीस तासाच्या आत पाच आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले होते. त्या सर्वांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. (Paranda Nwes) त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना ही पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी (दि.२९) सर्व आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना माढा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे (वय-४९)रा.वरुड ता.भूम , प्रदीप आजिनाथ पाडुळे (वय-३१),रा.कौडगाव ता.परंडा , समाधान हनुमंत मिस्किन (वय-२६) रा.डोमगाव ता.परांडा,किरण उर्फ लादेन भीमराव बरकडे (वय-३१)रा.बुरुडवाडी ता.भूम, जगदीश महादेव ठवरे-पाटील (वय-२४) रा.कौडगाव ता.परंडा , गणेश बबन जगदाळे रा.खासगाव ता.परंडा व परशुराम येडाबा शिंदे रा.साकत ता.परंडा या ७ जणांना जामीन मिळाला .(Paranda Nwes)