बीड : बीडच्या माजलगाव शहरात भर दुपारी भाजपच्या कार्यकर्त्यांची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची काल (ता. 16) घडली होती. बाबासाहेब आगे असं भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आज भाजपच्या नेत्या आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी बाळासाहेब आगे यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारली असल्याचे सांगितले.
‘बाबासाहेब आगे यांच्या हत्येने मन सुन्न झालं. एक धडाडीचा कार्यकर्ता गमावला.’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. संघाचे संस्कार त्यांच्यावर असल्याने प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. माझ्या लोकसभा निवडणुकीत बुथ विस्तारक म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांनी खूप मेहनतीने पार पाडली. अशा मनमिळावू कार्यकर्त्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाली हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या अशी भावना देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या हत्येनंतर आता पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार दिला आहे.
दरम्यान आगे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.