लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती परीसरातील स्टेशन भागात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रविवारी (ता. 7) रात्री दहा वाजनेच्या सुमारास नंग्या तलवारी, कोयते व हॉकीस्टीक हातात घेऊन, भररस्त्यात हैदोस घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. कवडीपाट परीसरातील एक भाई तुरुंगातुन सुटुन आल्याच्या आनंदात, संबधित भाईच्या समर्थकांनी लोणी स्टेशन परीसरात दहशत निर्माण करण्यासाठी आठ ते दहा जणांनी नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह हैदोस घातल्याची चर्चा सुरु होती.
पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी स्टेशन ते इंदीरानगर या दरम्यान भरवस्तीत आठ ते दहा जण नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह हैदोस घालत असल्याचे पाहुन, या भागातील अनेक नागरीकांनी लोणी पोलिस ठाण्यासह शहर पोलिसांच्या हॉटलाईन (112 नंबर) वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही ठिकाणी संपर्क होऊ न शकल्याने, पुणे शहर पोलिसांच्या कायदा व सुवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे सर्वसामान्य नागरीकांना पहावयास मिळाले. दरम्यान लोणी स्टेशन परीसरात दहशत निर्माण करण्यासाठी नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह हैदोस घालणारे गुंड त्यांच्या कथीत भाईवर जरब बसेल अशी कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
लोणी स्टेशनहुन इंदीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री दहा वाजनेच्या सुमारास आठ ते दहा गुंड, हातात नंग्या तलवारी, कोयते व हॉकीस्टीक हातात घेऊन अवतरले. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना शिवीगाळ करण्याबरोबरच, रस्त्यात दिसेल त्या वाहनांना अडवुन दमबाजी करण्यास सुरुवात केली. आठ ते दहा जणांचा नंगानाच पाहुन अनेक नागरीकांनी आपआपली दुकाने बंद करुन, दुकानातच बसणे पसंत केले. त्यातच आठ ते दहा जण रस्त्यातुन जातांना शिवीगाळ व हातपाय तोडण्याची भाषा करत असल्याने, लोणी स्टेशन परीसरात एकच भितीचे वातावरण पसरले.
इंदीरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यात चालु असलेला आठ ते दहा जणांचा नंग्या तलवारीसह हैदोस पाहुन, कांही नागरीकांनी लोणी काळभोर पोलिस ठाणे, काही पोलिस कर्मचारी, शहर पोलिसांच्या हॉटलाईन (112 नंबर) वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तीनही ठिकाणी कसलाही संपर्क होत नसल्याचे पाहुन, लोणी स्टेशन येथील एका नागरीकाने एका ओळखीच्या पोलिस अधिकाऱ्याला मोबाईल फोनवरुन वरील घटनेची माहिती दिली. त्यानंतर मात्र लोणी काळभोर पोलिस ठाण्यातुन एक अधिकारी व काही कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र पोलिस पोचण्यापुर्वीच वरील गुंड फरार झाले होते. पोलीस आले, त्यांनी पाहिले, गुंडाचा पाठलाग केला असला तरी, वरील घटनेने शहर पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे दिसुन आले.
शहर पोलिसांची हॉटलाईन (112 नंबर) नावालाच…
लोणीस्टेशन परीसरात आठ ते दहा जण तासभर नंग्या तलवारी, कोयते व हॉकीस्टीक हातात घेऊन, भररस्त्यात हैदोस घालत असतांना, अनेक नागरीकांनी आपआपल्या मोबाईल फोनवरुन, शहर पोलिसांच्या हॉटलाईन (112 नंबर) वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वरील दोन्ही ठिकाणचे फोन व्यसत लागत असल्याने, नागरीकांना गप्पगुमान घऱात कोंडुन घ्यावे लागले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वरील घटनेची गंभीर दखल घेऊन, शहर पोलिसांच्या हॉटलाईन (112 नंबर) च्या व्यवस्थेची चौकशी करावी. अशी मागणी नागरीकांनी केली आहे.