– अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील (ता.6) जुलै रोजी रात्री पिंपरी चिंचवड येथून ओला उबेर कारचालक दत्ता बामाजी फंड (रा. कात्रज, पुणे) यास अनोळखी व्यक्तीने कार बुक करून रांजणगाव गणपती येथे देवदर्शनाला जायचे आहे, असे सांगुन गणपती मंदिराच्या पार्किंगमध्ये पोचल्यानंतर त्याच्या आणखी एका साथीदारास सदर ठिकाणी बोलावून घेऊन कारचालक दत्ता बामाजी फंड यास गाडीचे भाडे दिले नाही.
परंतु त्यांनी त्या उबेर कारचालकास दोन्ही अनोळखी इसमांनी कारचालक यास शिवीगाळ, दमदाटी केली, तसेच कारचालकाचा पंधरा हजार रुपये किंमतीचा एम.आय.कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला आणि फरार झाले. दत्ता बामाजी फंड (रा. कात्रज, पुणे) यांच्या फिर्यादीवरून दोघांवरती जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनोळखी इसमाने पिंपरी चिंचवड पुणे येथून गाडी बुक केली असून त्यानुसार कारचालक दत्ता फंड हे सदर अनोखळी इसमास रात्री सव्वादोन च्या सुमारास घेऊन रांजणगाव गणपती मंदिराच्या पार्किंगमध्ये आल्यावर कारचालक यांनी सदर अनोळखी इसमास गाडीचे भाडे मागीतले असता.
त्यावेळी सदर अनोळखी इसमाने त्याच्या आणखी एका साथीदारास सदर ठिकाणी बोलावुन घेवुन कारचालक दत्ता बामाजी फंड यास गाडीचे भाडे न देता दोन्ही अनोळखी इसमांनी कारचालक यास शिवीगाळ, दमदाटी करुन कारचालकाचा पंधरा हजार रुपये किंमतीचा एम.आय. कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेवून फरार झाले होते. सदर घडलेल्या प्रकाराबाबत ओला उबेर कारचालक दत्ता बामाजी फंड यांच्या फिर्यादीवरुन दोन अनोळखी इसमांच्या विरुध्द 06 जुलै 2024 रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे व सहा. पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार नवसरे यांनी तपास पथकास गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ ,यांनी रांजणगाव परिसरातील दहा ते बारा CCTV कॅमेरे चेक केले. गुन्हयातील आरोपींचा शोध घेतला असता, आरोपी गुरप्रीत इंद्रजीत सिंग वय 21 वर्षे, रा. नेहरुनगर, पिंपरी चिंचवड, पुणे, कृष्णा सतीश टांगतोडे वय 19 वर्षे, सध्या रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि.पुणे. मुळ रा. पाथर्डी, ता.जि. नाशिक यांना दि. 06/07/2024 रोजी रात्री पावणे नऊ वाजता अटक केली. सोबतच त्यांचेकडून सदर गुन्हयामध्ये चोरलेला पंधरा हजार रुपये किंमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे.
सदरची कामगीरी मा.पंकज देशमुख सो. पोलीस अधिक्षक सो. पुणे ग्रा., मा. रमेश चोपडे सो. अपर पोलीस अधिक्षक पुणे, श्री. प्रशांत ढोले सो. उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहा. फौज, दत्तात्रय शिंदे, पो.कॉ. उमेश कुतवळ, पो. हवा. विलास आंबेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, हे करत आहेत.