पुणे : Pune Crime क्रेडीट कार्ड काढून देण्याची बतावणीकरून (the pretext of canceling a credit card) एका तरुणीने महिलेकडून खात्याचा ओटोपी घेतला. आटोपीचा वापरकरत या महिलेच्या बँक खात्याद्वारे लोनकरून (Loan taken in the name of a woman) चार आयफोन तसेच तिच्या मित्राच्या नावावर दोन आयफोन (6 iPhones were taken) घेऊन तब्बल ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात ४६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, भोसरी भागातील एका तरुणीवर गुन्हा नोंद केला आहे. दोन वर्षांपुर्वी हा प्रकार घडला असून, नुकताच या महिलेला याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना तरुणीने क्रेडीट कार्ड काढून देण्याची बतावणी केली. त्यांच्याकडून काही कागदपत्रे घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या एका मित्राचेही कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून बँकेचा ओटीपी मिळविला. या आटोपीच्या आधारे तिने महिलेच्या खात्यावर आयफोनचे २ लाख ७० हजारांचे लोनकरून चार मोबाईल घेतले. तसेच, त्यांच्या मित्राच्या कागदपत्रांच्या आधारे त्याच्या नावावर लोनद्वारे दोन आयफोन घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.