New Delhi : नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 68 वर्षीय वक्तीने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान या नराधामाच्या कृत्याच्या स्व:ताच्या मुलानेच पर्दाफाश केला आहे. मुलाने आपल्याच वडिलाचे हे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ पीडितेच्या वडिलांना पाठवला त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीचा मुलगा मिर्झापूर वेब सिरीजमधील खलनायक कालिन भैयाच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेने प्रभावित होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दिल्लीतील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, 27 जून रोजी पोलिसांना एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना एक माहिती दिली. त्यानुसार एका वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. (New Delhi) पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी लगेच पीडितेशी संपर्क साधला. त्यावेळी अल्पवयीन मुलीने सांगितलेला सगळा प्रकार ऐकून पोलिसही हादरले. पीडितेच्या घराशेजारी राहणारा एका 68 वर्षीय व्यक्ती तिच्या घरी यायचा. दोन महिन्यांपूर्वी आरोपींने तिला घेऊन त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर घडलेली घटना कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने कोणालाच काय घडलं हे सांगितलं नाही. 27 जून रोजी आरोपीच्या मुलाने पीडितेच्या वडिलांना व्हिडिओ पाठवला होता. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, वडिलांनी मुलीचा हा व्हिडिओ पाहताच त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. त्यांनी मुलीला या प्रकाराबाबत विचारताच तिने तिच्यासोबत घडलेला घृणास्पद प्रकार सांगितला. (New Delhi) पीडितेने म्हटलं आहे की, आरोपी कोणत्या कोणत्या बहाण्याने तिच्या घरी यायचा आणि अश्लील इशारे करायाच. एप्रिल महिन्यात ती गल्लीतून जात असताना तिला घरी बोलवलं आणि तिच्यावर अत्याचार केला. दोन महिन्यांपर्यंत मुलगी सतत दबावाखाली वावरत होती. त्याचवेळी आरोपीच्या मुलाने पित्याच्या या कृत्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला होता.
ज्या वेळेस पोलिसांनी व्हिडिओ आलेल्या नंबरची तपासणी केली तेव्हा आरोपीच्या मुलाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.(New Delhi) त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याला वाटतं होतं की त्याचे वडिल काळी जादू करतात. त्यामुळंच ते त्याच्याकडे नीट लक्ष देत नाहीत. म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवायला म्हणून त्याने मोबाईलचा कॅमेरा ऑन ठेवून दिला होता. ज्यात संपूर्ण घटनाक्रम कैद झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.