Nashik Crime | नाशिक : भरदिवसा सराईत गुन्हेगाराने भाजपच्या एका बड्या नेत्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सिडको येथून समोर आली आहे. या हल्ल्यात भाजप नेत्यास दोन गोळ्या लागून जखमी झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महापालिका पार्कींगचे कंत्राट तसेच हप्ता वसुलीचा वादातून हा हल्ला झाल्याये समजते आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पोलीसांनी टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली आहे.
राकेश कोष्टी असे गोळीबार झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. कोष्टी यांना सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हा हल्ला कोष्टी यांना ठार मारण्याच्या हेतूनेच झाला होता.
हप्ता वसुली आणि पार्कींगच्या कंत्राटातील वादातून हे कृत घडले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हल्लेखोरांनी पाळत ठेवून कोष्टीचा खातमा करण्याच्याच उद्देशाने हल्ला चढविला. परंतु, सुदैवाने तो बचावला.
या हल्ल्यानंतर पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या रिक्षासह सात-आठ कोयते पोलीसांनी जप्त केले आहेत. जखमी कोष्टीवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
याप्रकरणी उमेश गवई (रा. दत्तचौक, सिडको) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जया दिवे, किरण शेळके, विकी ठाकूर, सागर पवार अशी हल्ले खोरांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.