पिंपरी-चिंचवड : पतीकडून विवाहेच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीला शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक त्रास. कंटाळून 36 वर्षीय महिलेने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील चौधरी पार्क दिघी येथून रविवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलीसांनी पतीस ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी महिलेच्या भावाने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पती सोमनाथ बबन साकोरे (वय 40, रा. चौधरी पार्क, दिघी) यास पोलीसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2004 मध्ये सोमनाथ व आत्महत्याग्रस्त महिलेचा विवाह सपन्न झाला होता. त्यानंतर आरोपी पती सोमनाथ कडून पत्नीचा वेगवेगळ्या कारणावरून छळ केला जात होता.
तसेच घरगुती वादातून व चारित्र्यावर संशय घेऊन सोमनाथ याने पत्नीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली व तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याला कंटाळून विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.