Nandurbar News : नंदुरबार : खासदार अमोल कोल्हे यांचा पी.ए.असल्याचे सांगत शहादानजीक अपघातग्रस्तांना मदत करावी. तसेच त्यांना आर्थिक मदत करून मुंबईला रवाना करण्याचे सांगत पोलिसांची एक हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी नंदुरबा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Hello I am speaking MP Amol Kolhen’s PA saying,
Totaya P. A. Financially cheated the police.)
वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असल्याचे सांगून केली फ़सवणूक
आमचा अपघात झाला आहे, आम्हाला मदत द्या डिझेलसाठी जेवणासाठी पैसे द्या; अशी खोटी कहाणी रचून आणि खासदार अमोल कोल्हे यांचे नाव सांगून जिल्हा पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील यांना मोबाईलवर संपर्क करून ही फसवणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जून रोजी रात्री ११ वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर मोबाईल क्रमांक ०९३७३९३९११३ या क्रमांकावरून वरुन काहीतरी काम असल्याचा मेसेज आला. (Nandurbar News) त्यानंतर पाटील यांनी लगेचच त्यांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहीते यांना मदत करण्यास सांगीतले. त्यानुसार मोहिते यांनी तत्काळ नमुद मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता,संबधिताने त्यांचे नाव प्रबोधचंद्र सावंत असे सांगून ते खासदार अमोल कोल्हे यांचे पीए असलेबाबत स्पष्ट केले. एका वाहनाचा शहादा येथे अपघात झाला असल्याचे सांगून त्यांना तातडीने मदत करावी म्हणून सांगितले.
मदतीसाठी त्यांनी ०९८३४३९५८०९ हा मोबाईल नंबर दिला त्यावर मोहिते यांनी संपर्क केला असता, मोबाईलधारकाने आपले नाव रविकांत मधुकर फसाळे असे कळवून त्यांच्या बोलेरो वाहनाचा शहादा येथे अपघात होवून चार जण ठार व ७ ते ८ जण जखमी झाल्याचे व त्यांच्यावर नंदुरबार येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले. (Nandurbar News) दरम्यान याबाबत नियंत्रण कक्षात माहिती दिली असता असा कोणताच अपघात झाला नसल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. त्यानंतर फौजदार मोहिते यांना पुन्हा त्याच क्रमांकावरून फोन आला. तात्काळ रुग्णवाहिकेने शिवाजीनगर पुणे येथे जाणे असल्याने वाहनात डिझेलसाठी सात हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगीतले. पुन्हा रविकांत मधुकर फसाळे यांनी फौजदार मोहिते यांना कॉल करून सकाळपासून काहीही खाल्ले नाही उपाशी आहोत, कृपया आम्हाला जेवणासाठी दोन हजार रुपयांची मदत करावी असे सांगितले. त्यावर मोहिते यांनी सावंत यांना विचारले असता, त्यांनीही याबाबत दुजोरा देत खासदार कोल्हे यांचा निरोप असल्याचे सांगितले. मोहिते यांनी माणूसकीच्या नात्याने फसाळे याच्या फोन पे अकाऊंटवर एक हजार रूपयांची मदत पाठविली.
दरम्यान, याबाबत माहिती घेतली असता अशी कोणतीच घटना परिसरात घडली नसल्याचे स्पष्ट झाले. खासदार अमोल कोल्हे यांचे पीए प्रबोधचंद्र सावंत यांचे नाव सांगून पोलिसांना अपघाताबाबतची खोटी माहीती दिली व पोलिसांची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. (Nandurbar News) पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्यात तरुणाला नोकरीचे आमिष आणि टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल १६ लाखांची फसवणूक