Nagpur News नागपूर: गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. खेळताना तीन मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. (Nagpur News) या चिमुकल्यांच्या घातपाताची शंका नागपूर पोलिसांनी व्यक्त केली होती. (Nagpur News) नागपूर पोलिस त्याबाबत तपास करत होते. नागपूरच्या फारूक नगरमध्ये एका कारमध्ये तिन्ही चिमुकल्यांचे मृतदेह आढळुन आले आहेत. (Nagpur News) या धक्कादायक घटनेमुळे नागपूर हादरले आहे. (Nagpur News)
मृत चिमुकल्यांची नावे पुढीलप्रमाणे
आलिया फिरोज खान (वय ६), तौसिफ फिरोज खान (वय ४), आफरीन इर्शाद खान (वय ६) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.
पाचपावली पोलिस हद्दीतील फारुखनगरच्या मोहम्मदीया मशिदीजवळ राहणाऱ्या दोन मुली आणि एक मुलगा शनिवारी (ता.१७) दुपारी अचानक बेपत्ता झाले होते. रविवारी (ता.१८) सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एका नादुरुस्त कारमध्ये त्या तिघांचेही मृतदेह आढळले आहेत. या वृत्ताने परिसरात खळबळ उडाल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. दरम्यान, त्यांचा गुदमरून मृत्यू झाला की घातपात झाला याचा पोलिस तपास करीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.१७ ) दुपारी बारा वाजता फारुखनगरला लागून असलेल्या खंतेनगर येथील शाळेच्या मैदानावर ही मुले खेळण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाहीत. यानंतर तिसरी मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पसरली. हे कळताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी फारुखनगर, बाबा बुद्धाजीनगर, वैशालीनगर, टेका, नवी वस्ती, महेंद्रनगर आणि आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला. मुले कुठेच आढळली नाहीत. यामुळे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला.