Nagar News : : कोतवाली, (नगर) : कोयत्याने मारहाण करून ८ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी निर्मलनगर परिसरातून जेरबंद केले आहे.
निर्मलनगर परिसरातून केले जेरबंद
स्वामीनाथ अनिल सायंबर (वय २३, रा. गाडेकर चौक, निर्मलनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रवि कचरु गोंधळी (वय २८ वर्षे, रा. गोकुळवाडी, सर्जेपुरा, अहमदनगर) यांनी तक्रार दिली होती.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि गोंधळी यांना १२ जानेवारी २०२३ रोजी आरोपी स्वामीनाथ अनिल सायंबर व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून कोयत्याने मारहाण करून जखमी केले होते. (Nagar News ) रवि गोंधळी यांनी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यावेळी आरोपी स्वामीनाथ सायंबर फरार झाला होता. आरोपी घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्याला निर्मलनगर येथून शिताफिने ताब्यात घेतले. (Nagar News ) आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करत आहेत.
सदराची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, रामनाथ हंडाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Bhimanagar News : भोई समाजाच्या वतीने नारळी पौर्णिमा उजनी धरणात अतिउत्साहात साजरी..