Nagar News : अहमदनगर : सायकल चोरीचे गुन्हे शहरात वाढीस लागले आहेत. कोतवाली पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणांवरून सायकली चोरी करणाऱ्या अट्टल चोराला जेरबंद केले आहे. चोरीला गेलेल्या ५५ हजार रुपये किमतीच्या ११ सायकली कोतवाली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. हस्तगत केलेल्या सायकली ज्या नागरिकांच्या असतील, त्यांनी ओळख पटवून पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
नागरिकांना संपर्क साधण्याचे आवाहन
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सायकल चोरी प्रकरणी दिनेश शेषराव व्यवहारे (वय ५०, रा. दातरंगेमळा, अहमदनगर) या आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. (Nagar News) याप्रकरणी टेलर काम करणाऱ्या अजय काजी मोरे (वय ५४ वर्षे, रा. बागडेमळा, बालीकाश्रमरोड, अहमदनगर) यांची सायकल सांगळेगल्ली येथून १२ ऑगस्ट रोजी चोरीला गेली होती. कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरू कोतवाली पाोलीस करत होते. त्यावेळी त्यांना शहरातील विविध ठिकाणांवरून दिनेश व्यवहारे याने सायकली चोरी केल्या असून, तो सायकल विक्री करण्यासाठी गाडगीळ पटांगणात येणार असल्याची माहिती मिळाली. (Nagar News) या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी गाडगीळ पटांगण परिसरात सापळा लावला. आरोपी दिनेश व्यवहारे चोरीची सायकल विक्री करण्यासाठी आला असता त्याला कोतवाली पोलिसांनी पकडले.
दरम्यान, आरोपीची कसून चौकशी केली असता, शहरातील विविध ठिकाणांवरून ११ सायकली चोरल्याची कबुली त्याने दिली. शहरातून समर्थ शाळा सांगळे गल्ली, गाडगीळ पटांगण, प्राची कोचिंग क्लासेस दातरंगे मळा, बागराज हडको, नालेगाव व परिसरातून सायकल चोरी केल्याचे आरोपीने सांगितले. काही सायकलींवरील नाव आणि रंग बदलण्यात आला आहे. (Nagar News) ज्या नागरिकांच्या सायकली चोरीला गेल्या त्यांनी कोतवाली पोलिसांसोबत संपर्क करून आणि सायकलीची ओळख पटवून सायकल घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे. पोलीस नाईक कैलास शिरसाठ ९८२२८७८३६४, मुकुंद दुधाळ ९५२७३५०७१५ आणि सागर मिसाळ ८३२९६१४४४१ यांच्याशी संपर्क करून सायकली घेऊन जाण्याचे सांगण्यात आले आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मुकुंद दुधाळ करत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, (Nagar News) अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस अंमलदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, कैलास शिरसाठ, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ahmednagar News : प्रवाशाला लुटून पळून जाणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पाठलाग करून ठोकल्या बेड्या
Nagar News : ..अन् फिर्यादीच निघाला चोर..! नऊ लाखाची रोकड जप्त, कोतवाली पोलीसांची कामगिरी..
Nagar News : यवतमाळ येथील प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..