Nagar News : कोतवाली, (अहमदनगर) : मशीनद्वारे सुगंधी तंबाखू व सुपारी बारीक करून मावा तयार करणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देंमाल जप्त करण्यात आला आहे.
फयाज इलियास शेख (वय २१ वर्ष, रा.कोठला झोपडपट्टी, अहमदनगर), सुफीयान नासीर शेख, (वय २० वर्ष, रा. बड़ी मस्जीद जवळ, मुकुंदनगर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. शहरातील झेंडीगेट परिसरातील सैदु कारंजा मस्जीद जवळ ही कारवाई करण्यात आली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशीनद्वारे सुगंधी तंबाखू व सुपारी बारीक करून मावा तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार झेंडीगेट परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधीत तंबाखु व सुपारी बारीक करून प्रतिबंधित मावा विक्री केला जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्तबातमीदारा मार्फत मिळाली होती.
दरम्यान, कोतवाली पोलिसांनी दोन पंचासोबात गुरुवारी (ता. २०) सापळा लावून छापा टाकला. या कारवाईत एक लाख ३० हजार रुपये किमतीची सुपारी फोडण्याचे लोखंडी मशीन, तीन हजार ६०० रूपये किमतीची सुगंधी तंबाखुचे सिल्व्हर रंगाचे १८ पाकीट, ५ हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रीक वजन काटा असा एक लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक मनोज कचरे, शाहीद शेख, रविंद्र टकले, दिपक रोहकले, सुमित गवळी, प्रमोद लहारे यांनी ही कारवाई केली. Nagar News