Nagar News : नगर : अहमदनगर शहरातील फकीरवाडा येथे संदलदरम्यान औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहराचे नामांतर झाल्यानंतर एका मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर्स हातात घेऊन नाचत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियीवर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (If anyone takes Aurangya’s name in Maharashtra, he will not be pardoned – Deputy Chief Minister Devendra Fadnavis; A case has been registered against four people in connection with the poster.)
पोस्टर झळकवल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल..
या मिरवणूकीदरम्यान वेळीदोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घोषणा देखील देण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकारानंतर औरंगजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांना माफी नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. (Nagar News) त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगर शहराचे देखील नाव बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या घोषणेनंतर अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर नगर असं करण्यात आलं आहे. या नृदरम्यान सोशल मीडियावर औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. (Nagar News) त्यामुळं आता यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. याबाबत एका नामांकित वृत्त वाहिनीने वृत्त दिले आहे.
दरम्यान, अहमदनगरच्या नामांतराचा प्रस्ताव शिंदे फडणवीस सराकारकडून राज्य सरकारच्या मंजूरीनंतर केंद्राकडे पाठवला आहे.(Nagar News) केंद्र सरकारच्या मंजूरीनंतर अहमदनगरच्या नामांतराची प्रक्रिया पूर्ण होईल.
महाराष्ट्रात कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी दिली जाणार नाही, त्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. (Nagar News) तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच महाराष्ट्रात कोणी औरंगजेबाचे पोस्टर झळकावत असेल तर ते मान्य केलं जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. त्यामुळं कुणी असं कृत्य केलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे,
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nagar News : माळीवाडा बसस्थानक पसिरातून 2 किलो गांजा जप्त, दोघांना अटक