Nagar News : पाथर्डी, नगर : राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग कार्यालयाने अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जिरेवाडी येथील बनावट देशी दारु निर्मीतीच्या कारखान्यावर छापा टाकून ५ लाख ८२ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ५ जणांना ताब्यात घेतले आहे. (Nagar News)
सतिश नवनाथ डमाळे (वय ३८, रा. बोंदरवाडी, ता. पाथर्डी) नितीन रामनाथ डमाळे (वय ३०, रा. बोंदरवाडी ता. पाथर्डी), सुखदेव ज्ञानदेव आंधळे (वय ५५, रा. जिरेवाडी ता. पाथर्डी) अरुण विठ्ठ्ल कराड वय ३२, रा. येळी, ता. पाथर्डी) संजय विठ्ठ्ल कराड (वय २८ रा. येळी, ता. पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सतीश डमाळे व नितीन डमाळे यांनी यांना न्यायालयाने ०३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून उर्वरीत आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Nagar News)
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशान्वये व विभागीय उपआयुक्त श्री. मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीनुसार, (Nagar News) राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विभागीय भरारी पथक पुणे विभाग यांच्या पथकाने सोमवारी (ता. १९) सुखदेव आंधळे यांचे शेतामधील राहत्या घराच्या पाठीमागे, पत्रा शेडमध्ये, जिरेवाडी गावचे हददीत देशी दारू बनवीत असल्याची माहिती मिळाली होती. (Nagar News)
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सदर छापा मारुन स्पिरीटने भरलेले ३५ लिटर क्षमतेचे २ प्लास्टीक कॅन, स्पिरीट, ३५ लिटर क्षमतेच्या ५ प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे १७५ लिटर देशी दारुचा तयार ब्लेंन्ड, बनावट देशी दारु बॉबी संत्राच्या ९० क्षमतेच्या १९०० सिलबंद बाटल्या (१९ बॉक्स), देशी दारुची बनावट झाकणे २४०० व लेबल ५५८०, बुचे सिल करण्याचे सिलींग मशीन तसेच आदी मुद्देमाल मिळून आला. देशी दारुची वाहतुक व विक्री करणेकामी वापरलेला एक टाटा कंपनीचा ४०७ मॉडेलचा चारचाकी टेंम्पो मिळून आला. (Nagar News)
सदरील कारवाईमध्ये विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार शा. जाधव, दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील राज्य उत्पादन शुल्क, श्रीरामपूर विभागाचे निरीक्षक बी .बी. हुलगे, दु. निरीक्षक आर. ए. घोरपडे, ए. के. शेख तसेच जवान प्रताप कदम, एस.एस. पोंधे, अमर कांबळे, अहमद शेख, भरत नेमाडे, अनिल थोरात, अमोल दळवी, एस.व्ही.बिटके, एन.आर. ठोकळ व पी.डी. साळवे यांनी सहभाग घेतला असून गुन्हयाचा पुढील तपास विभागीय भरारी दु. निरीक्षक ए. सी. फडतरे हे करीत आहेत. (Nagar News)