(Nagar Crime) अहमदनगर : शहरात बेकायदेशीरपणे तलवार, कोयते, गुप्ती अशी अवैध हत्यारे बाळगणाऱ्या दोघांना (Nagar Crime) कोतवाली पोलीसांनी बुधवारी (ता.२२) बेड्या ठोकल्या.
कुणालसिंग कमल सिंग जुन्नी (वय १९, रा. काटवनखंडोबा अहमदनगर) व अर्शद रशिद शेख (वय- २२, रा. इमामवाडा, नविन टिळकरोड अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सलीम शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
शहरातील काटवन खंडोबा कमानीच्या जवळ टिळकरोड लगत आरोपी कुणालसिंग जुन्नी हा अवैध हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगून विक्री करत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आरोपींना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे एक पथक तयार केले.
पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपी कुणालसिंग जुन्नी याला मोठ्या शिताफीने पकडले. तसेच आरोपीच्या कब्जातील दोन तलवारी, एक कोयता. एक सत्तुर अशी हत्यारे जप्त केली आहेत.
दरम्यान, आरोपी कुणालसिंग जुन्नी याला ताब्यात घेऊन जप्त केलेल्या हत्यारांबाबत अधिक विचारपूस केली असता, आरोपीने सदरची हत्यारे त्याचीच असून या हत्यारांमधील एक मोठा कोयता व एक चाकु हा अर्शद रशिद शेख याचा असल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी शेख यालाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश बोरुडे करीत आहेत.
ही कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पिंगळे, पोलीस अंमलदार सतिष भांड, दिपक बोरुडे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, अतुल काजळे, सुजय हिवाले, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, शरद धायगुडे आणि कावेरी फुगारे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Indapur Crime : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या ; वालचंदनगर पोलिसांची कामगिरी..!
Old Pension Scheme : संप काळात आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्याच्या आरोग्य आयुक्तांच्या सूचना!