Mumbai News मुंबई : मुंबईत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खूपच वाढ झाली आहे. (Mumbai News) अलीकडेच मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एका तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. (Mumbai News) त्यानंतर आता एका 30 वर्षीय महिलेची ऑटोरिक्षात हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Mumbai News)
मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेशी वाद झाल्यानंतर आरोपीने महिलेचा गळा चिरून ऑटोमध्ये बसून तेथून पळ काढला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. हि अतिशय संतापजनक घटना आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरीक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपासयंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे. असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.