Mumbai crime News : मुंबईत राहायला स्वतःचे घर नसल्याने आणि घराचे भडण्या इतके पैसे नसल्यामुळं पतीनेच पत्नीला मित्रांच्या स्वाधीन केल्याची चिड आणणारी घटना उघडकीस आली आहे. घाटकोपरमध्ये ही घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या पतीने व मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. मात्र, आता सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये ही घटना घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतनगर येथे राहणाऱ्या तरुणाला नोकरी नव्हती त्यामुळं त्याची आर्थिक स्थिती कमकुवत होती. पाच वर्षांपूर्वी त्याचा सांगली येथील एका पीडितेशी लग्न झाले होते. त्याला दोन मुलीदेखील आहेत. आधीच नोकरी नाही. त्यात ५ पणांचा खर्च यामुळे तो त्रस्त होता. मुंबईत राहण्यासाठी जागा नसल्याने पत्नी आणि नुली सांगलीतच राहत होत्या. मागील आठवड्यात पीडित पत्नीदोन मुलींना घेऊन मुंबईत आली होती. घर भाड्याने घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते.
त्यामुळे तो 9 आणि 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री पत्नीला घेऊन घाटकोपर येथील एका शाळेमागे गेला. तिथे तिला मित्रासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपी तिला एका सुनसान व भग्न इमारतीत घेऊन गेला व तिथे दोन मित्रांसोबत तिची ओळख करुन दिली. पतीने तिचे तोंड बंद केले आणि हात बांधून ठेवले त्यानंतर दोघांनी पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर पतीने तिला सांगितले की, दोन्ही मित्र मला भाड्याचे घर घेऊन देणार आहेत तसंच, भाडे भरण्यासाठी मदतदेखील देणार आहेत. सांगेन तेव्हा तुला त्यांच्यासोबत शारिरीक संबंध ठेवावेच लागतील. त्यासाठी त्यांनी आरोपी पतीला 10 हजार रुपये दिले होते.
पतीच्या अशा वागण्याला संतापलेली पत्नी मुलींना घेऊन लगेचच माहेरी सांगलीला गेली. तिथे तिने तिच्या घरच्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितने घरच्यांच्या मदतीने पोलीस स्टेशमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर सांगली पोलिसांनी हा गुन्हा पंतनगर पोलीस ठाण्यात वर्ग केला, पोलीसांनी लगेचच कारवाई करत दोन मित्रांना अटक केली.