पुणे – शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने तरडे (हवेली) येथील भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोमधुन बाहेर पडलेल्या टँकरमधील डिझेल, पेट्रोलची परस्पर विक्री करीत असल्याच्या संशयावरुन मागिल महिनाभऱात तब्बल एकविस टॅंकर ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या बहुतांश टॅंकरमध्ये चोर कप्पे असल्याचा संशय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला असुन, या गोरख धंद्यात भारत पेट्रोलियम कंपणीचे कांही वरीष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशय पोलिसांनी व्य़क्त केला आहे.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सुचनेनुसार, शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने तरडे (हवेली) येथील भारत पेट्रोलियम कंपणीच्या डेपोजळ छापा टाकुन, इंधन चोरीचा गोरख धंदा करणाऱ्या बालाजी मधुकर बजबळकर (वय ४१ ),दत्तात्रय गजेंद्र बजबळकर (वय ४१, दोघे रा. आनंद नगर, माळवाडी) उत्तम विजय गायकवाड (वय ३१), अजिंक्य मारुती शिरसाठ (वय २६ तिघे रा. लोणी काळभोर), साहिल दिलीप तुपे (वय २२) या आरोपींना अटक करण्याबरोबरच, इंधनवाहू टॅंकरमध्ये चोर कप्पे असण्याच्या संशयावरुन तब्बल बारा टॅंकर ताब्यात घेतले होते. त्यानंतर मागिल कांही दिवसात पोलिसांनी टॅंकरमध्ये चोरकप्पे असल्याच्या संशयावरुन आनखी नऊ टॅंकर ताब्यात घेतले आहे.
कुंपणच कसे व किती शेत खात होते हे वाचा इंधनाचा गोरख धंदा या “पुणे प्राईम न्यूज च्या मालिकेतील उद्याच्या बातमीत…
दरम्यान इंधन चोरीच्या संशयावरुन शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा इंधन वाहतुकीचे काम करणारे आनखी पस्तीसहुन अधिक टॅंकर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्यांने “पुणे प्राईम न्यूज” शी बोलतांना दिली आहे. इंधन चोरी करण्यासाठी तयार करण्यात आलेले चोर कप्पे टॅंकर मालकाच्या नकळत की टॅंकर मालकांना विश्वासात घेऊन तयार केल्याची गोपणीय माहिती घेण्याचे काम पोलिस करीत आहेत. टॅंकर चालकांनी व त्यांना साथ देणाऱ्या टॅंकर मालकांनी मागिल दहा वर्षाच्या काळात चोर कप्प्याच्या माध्यमातुन पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्हातील शेकडो पेट्रोल पंप चालकांना प्रतिदिन लाखोंचा गंडा घातला जात असल्याची चर्चा आहे.
असे केली जाते चोरी…
इंधनवाहु टॅंकरमध्ये आतल्या बाजुला कोणाच्याही लक्षात न येईल अशा पध्दतीने दोनशे लिटरपासुन ते चारशे लिटर क्षमचेता कप्पा बनवला जातो. इंधनाची वाहतुक करणारा टॅंकर पेट्रोल पंपावर पोचताच, विशीष्ठ सळईच्या (डिप) च्या माध्यमातुन टॅंकरमध्ये किती लिटर इंधन आहे याची तपासणी केली जाते. तपासणीत पंप चालकाला योग्य वाटले तरच, इंधन खाली करण्यास परवागी दिली जाते.
इंधन खाली केल्यानंतर, पंप मालकाचा एक माणुस टॅंकरवर जाऊन टॅंकर खाली झाला का याची पहाणी करतो. पंप मालकाचा माणसाला टॅंकर खाली झालेचे दिसत असले तरी, चालकाने तयार केलेल्या कप्प्यात, कप्प्याच्या क्षमतेप्रमाने इंधन राहते. व कप्प्यात राहिलेले इंधन परतीच्या मार्गात काढुन त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते. अशा गोरख धंद्यातुन टॅंकर चालक हजारो रुपये कमवत असल्याची चर्चा आहे.