लोणी काळभोर : पुणे – सोलापूर महामार्गावर दोन दुचाकींची सामोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर येथे आज मंगळवारी (ता.२४) साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एक गंभीर तर २ किरकोळ जखमी झाली आहे.
या अपघातात पल्सरवरील यशवर्धन गांधी व चेतन तिवारी हे गंभीर जखमी झाले आहेत. तर बुलेटवरील राहुल देवरे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर महामार्गावर मंगळवारी (ता.२४) साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने बुलेट (क्र. MH.12.LQ.7156) गाडीवरून राहुल देवरे चालले होते. तेव्हा त्याची गाडी एमआयटी कॉर्नर येथे आली असता, त्याचवेळी पल्सर (क्र. MH.39.K. 2533) गाडीवरून यशवर्धन गांधी व चेतन तिवारी हे लातूर बँकेकडून एमआयटी कॉर्नरकडे विरुद्धदिशेने चालले होते. याचवेळी दोघांच्या दुचाकींची सामोरासमोर जोरदार धडक दिली.
अपघाताचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
या अपघातात पल्सर वरील यशवर्धन गांधी व चेतन तिवारी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याचा हात व पाय फॅक्चर झाल्याची माहिती मिळत आहे. तर राहुल देवरे हे किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस हवलदार उमेश ढाकणे व सचिन कांबळे (बक्कल क्र.८९९५) हे एमआयटी कॉर्नर येथे कर्त्यव्य बजावत होते. तेव्हा हा अपघात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झाला. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून अपघातातील तिन्ही जखमींना तातडीने लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे. तसेच पोलिसांनी तातडीने वाहतूक कोंडी सोडवत वाहतूक पुन्हा सुरळीत केली.