Mehboob Pansare : जेजुरी, (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे यांचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी दोघांच्या मुसक्या जेजुरी पोलिसांनी आवळल्या आहेत. Mehboob Pansare
महिला आरोपी किरण वणेश परदेशी (वय – ३८) आणि मुलगा स्वामी वणेश परदेशी (वय-१९) ( दोघेही रा. जेजुरी, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपीना सासवड न्यायालयात हजर केले असता त्याना ११ जुलैपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. Mehboob Pansare
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मेहबूबभाई पानसरे यांनी तीन चार वर्षांपूर्वी नाझरे जलशयाजवळ जमीन खरेदी केलेली होती. यावरून परदेशी आणि पानसरे यांच्यात वाद सुरु होता. शुक्रवारी (ता. ०७) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास परदेशी यांनी जमीनीत ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी सुरू केली होती. मेहबूबभाई पानसरे हे पुतण्या राजू फिरोज पानसरे व साजिद युनूस मुलानी यांच्यासह तेथे जाऊन नांगरणी करू नये. कायदेशीर वाद मिटल्यावर जे करायचे ते करा असे म्हणत नांगरणी थांबवण्याचा प्रयत्न केला. Mehboob Pansare
यावेळी आरोपी वणेश प्रल्हाद परदेशी, महिला आरोपी किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी आणि एक लाल शर्ट घातलेला अनोळखी इसम यांनी बाचाबाची सुरू केली. यातच आरोपी वणेश याने मेहबूबभाई पानसरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. इतर आरोपींनी ही कोयता आणि पहारीने पानसरे यांच्या डोक्यावर मानेवर, पाठीवर दहा ते पंधरा वार केले. पानसरेसोबत असणाऱ्या दोघांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. मेहबूबभाई पानसरे यांच्यावर हल्ला झाल्याने त्यांना जेजुरीतील खासगी रुग्णालयात तेथून पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, जेजुरी पोलिसांनी फिर्यादी राजू पानसरे यांच्या फिर्यादीनुसार वणेश प्रल्हाद परदेशी त्याची पत्नी किरण परदेशी मुलगा स्वामी वणेश परदेशी, चुलता काका परदेशी आणि एक अनोळखी लाल शर्ट घातलेल्या इसमानविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जेजुरी पोलिसांना पाच आरोपीपैकी दोन आरोपीना पकडण्यात यश आले आहे. इतर तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. Mehboob Pansare