पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती रविवार पेठ परिसरात मेफेड्रॉनची तस्करी करणार्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५ लाखांचे एमडी, मोबाइल, दुचाकी असा मिळून ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही करवाई अमली पदार्थ विरोधी पथक दोनने केली आहे.
जतिन संतोष पवार (वय . २० रा. कुंजीर वस्ती, मांजरी बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक दोन रविवार पेठेत पेट्रोलिंग करीत असताना एकजण मेफेड्रॉन तस्करीसाठी आल्याची माहिती पोलीस हवालदार चेतन गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून जतीन पवार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाखांचे २५ ग्रॅम मेफेड्रॉन, मोबाइल, दुचाकी, असा ६ लाख ६ हजारांचा ऐवज जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, संदीप जाधव, चेतन गायकवाड, बोमादांडी, रवींद्र रोकडे , साहिल शेख, अजीम शेख, युवराज कांबळे, योगेश मांढरे, दिनेश बास्तेवाड, दिशा खेवलकर यांनी केली.