पुणे : आजच्या युगात वेबसाईटच्या माध्यमातून लग्नेही होऊ लागली आहेत. मात्र अशा माध्यमातून बनवलेल्या नात्यात अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेश मधील, हरदोई जिल्ह्यात उघडकीस आले आहे. येथील एक सुशिक्षित, आधुनिक विचारसरणीची मुलगी एका मॅट्रिमोनी ॲपद्वारे लग्नात अडकली आणि तिची फसवणूक झाली.
2019 मध्ये, जीवन साथी मॅट्रिमोनी ॲपद्वारे तिची एका तरुणाशी भेट झाली. मुलाचे वडील इंदूर पोलिसात उच्च पदावर आहेत. मुलगी आणि मुलामध्ये संवाद वाढला, दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. त्यानंतर काही दिवसांनी मुलाच्या कुटुंबीयांकडून हुंड्याची मागणी करण्यात आली. दरम्यान तो मुलगा अमेरिकेत जाऊन राहू लागला. काही काळाने मुलगीही अमेरिकेला पोहोचली आणि तिथे हिंदू रितीरिवाजानुसार दोघांचे लग्न झाले.
मुलीचे म्हणणे आहे की, लग्नानंतर तिला समजले की तिचा नवरा नपुंसक आहे. याशिवाय त्याने तिला रोज मारहाण करण्यास सुरुवात केली होती. याबाबत मुलीने आपल्या सासऱ्याकडे तक्रार केली असता, त्यांनी तिच्याशी अश्लील स्वरात बोलून आपला मुलगा जे सुख देऊ शकत नाही. ते माझ्याकडून घ्यावे आणि हे प्रकरण मिटवून टाकावे, असे सांगितले.
यामुळे धक्का बसलेल्या पीडितेने तिच्या वडिलांशी संपर्क साधला. आणि अत्याचार कथन केले. वडिलांनी कसेतरी तिला अमेरिकेतून हरदोईला परत आणले. आणि मुलीसह इंदूरला पोहोचले. पीडितेचा आरोप आहे की, तेथे सासरे आणि सासूने त्यांना घरात येऊ दिले नाही. त्याचवेळी त्याला धमकावून आपल्या पदाचा गैरवापर केला.
या संपूर्ण घटनेची तक्रार पीडितेने हरदोई पोलिसांकडे केली आहे. या लग्नामुळे पीडितेच्या पालकांनाही आपली फसवणूक झाल्याची भावना असून आता आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. हरदोई पोलिसांचे एएसपी अनिल कुमार यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पीडितेचा पती, सासू, सासरा, मेहुणी आणि नणदई यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.