Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manohar Mama Bhosale : मनोहर भोसलेचा ‘घोटी’ येथील आश्रम कायमचा बंद होणार? ग्रामपंचायतीचे पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र ; 27 एकरवरील आलिशान साम्राज्याची चौकशी करण्याची मागणी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 27 April 2026, 10:14

Manohar Mama Bhosale :  करमाळा, (सोलापूर) : स्वतःला ‘मन्यामामा’ म्हणवून घेत जादूटोणा आणि फसवणुकीच्या जाळ्यात हजारो भाविकांना ओढणाऱ्या मनोहर भोसलेचा ‘भोंदूगिरीचा फुगा’ आता फुटला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील घोटी येथील त्याच्या आलिशान आश्रमावर टाळे ठोकण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत आक्रमक झाली आहे. सरपंच विलासराव राऊत यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून हा आश्रम कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. Manohar Mama Bhosale :

मनोहर भोसलेवर गुन्हे दाखल झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत घोटी ग्रामपंचायतीने ही निर्णायक भूमिका घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुमारे 27 एकर क्षेत्रावर हा आश्रम विस्तारला होता. येथे अमावस्या आणि पौर्णिमेला मोठी गर्दी जमवून भविष्य सांगणे, जादूटोणा करणे आणि लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे गंभीर आरोप सरपंचांनी पत्रात केले आहेत. Manohar Mama Bhosale :

धक्कादायक बाब म्हणजे, ज्या गावात हा आश्रम आहे, तिथले स्थानिक नागरिक या आश्रमापासून नेहमीच लांब राहिले आहेत. मात्र, या ठिकाणी राजकारणी, सेलिब्रिटी आणि परराज्यातील लोकांची मोठी वर्दळ असायची. या आश्रमाच्या आडून नेमके कोणते व्यवहार चालत होते, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. Manohar Mama Bhosale :

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा रहिवासी असलेला मनोहर भोसले एकेकाळी आठवडी बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. शिक्षणात अपयश आल्यानंतर त्याने स्वतःला ‘संत बाळूमामांचा अवतार’ घोषित केले. बाळूमामांच्या नावाचा वापर करून त्याने अल्पावधीतच आपले साम्राज्य उभे केले. यापूर्वी इंदापूर-करमाळा सीमेवरील उंदरगाव येथील त्याचा आश्रमही अशाच गुन्हेगारी कारवायांमुळे बंद करण्यात आला होता. Manohar Mama Bhosale :

 

दरम्यान, मनोहर भोसलेवर केवळ फसवणुकीचेच नव्हे, तर एका महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हाही करमाळा पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ अंधश्रद्धेपुरते मर्यादित नसून, त्यामागे मोठे गुन्हेगारी रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पोलीस प्रशासन घोटी येथील या आलिशान आश्रमावर काय कारवाई करते आणि हा भोंदूगिरीचा अड्डा कायमचा उद्ध्वस्त होतो का, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. Manohar Mama Bhosale :

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

Pune News : पुण्यात पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या चौघांवर गुन्हा; पाषाणमधील संजय गांधी वसाहतीतील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp