Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड पोलिसांचा गुंडांना मोठा दणका; सात गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपी एमपीडीए अंतर्गत नागपूर कारागृहात स्थानबद्ध

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 August 2026, 18:43

दौंड : पुणे ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत दौंड शहरातील धोकादायक गुन्हेगार रितेश भीमराव गायकवाड (वय २७, रा. भीमनगर, दौंड) याच्यावर महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता (एमपीडीए) कायद्यांतर्गत कारवाई करत त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यातील जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करून त्यांच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दरोडे, जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे तसेच महिला आणि अल्पवयीन मुलींवरील गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली.

तपासात रितेश गायकवाड याच्याविरुद्ध सात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. त्यामध्ये घातक शस्त्रांनी हल्ला, जबर दुखापत, दरोडा, अल्पवयीन मुलीचा विनयभंग, विवस्त्र करण्याचा प्रयत्न, महिलांचा पाठलाग, दमदाटी आणि जबरदस्तीने मालमत्ता हिसकावून घेण्यासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी आरोपीविरुद्ध एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविण्यात आला. प्रस्तावाची छाननी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलै २०२६ रोजी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.

 

या आदेशानुसार दौंड पोलिसांनी विशेष पथके तयार करून २ ऑगस्ट २०२६ रोजी रितेश गायकवाडला ताब्यात घेत नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व दौंड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.

दरम्यान, सराईत गुन्हेगारांविरोधातील ही कठोर कारवाई पाहता, पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एमपीडीएचा प्रभावी वापर सुरू ठेवला असून, अशा प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

सासवड येथे खोट्या क्रिप्टोकरन्सीच्या नावाने तब्बल 22 लाखांची फसवणूक ; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.