Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर विषारी दारूकांडातील मुख्य सूत्रधार दत्ता लोंढेच्या आवळल्या मुसक्या ; उरुळी कांचन पोलीस अन् CID ची धडक कारवाई ; वेशांतर करून पळण्याच्या तयारीत असताना ठोकल्या बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 26 August 2026, 23:11

उरुळी कांचन : हडपसर दारूकांडातील गंभीर गुन्ह्यांमध्ये ‘पाहिजे’ असलेला सराईत आरोपी दत्ता उर्फ भावड्या भिमराव लोंढे (रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन) याला उरुळी कांचन पोलिसांनी आणि सी.आय.डी. पुणे पथकाने संयुक्त कारवाई करत शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपी वेशांतर करून तसेच वाहनाची नंबरप्लेट बदलून राजेवाडी (ता. पुरंदर) येथे पोलिसांच्या नजरेतून निसटण्याच्या तयारीत असताना पकडण्यात आला. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी दिली.
आरोपी दत्ता उर्फ भावड्या लोंढे यांच्यावर हडपसर व दापोडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये दाखल असून दोन्ही गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर हद्दीत विषारी दारू पिऊन 22 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता.
या सराईत गुन्हेगाराचा पोलीस अहोरात्र शोध घेत होते. दरम्यान, आरोपी दत्ता लोंढे हा शिंदवणे आणि शिंदवणे घाट परिसरात वेशांतर करून, रूप बदलून फिरत असल्याची अत्यंत गोपनीय बातमी उरुळी कांचन पोलिसांना मिळाली.बातमी मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी ही माहिती अत्यंत गुप्त ठेवत तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि सीआयडी पुणे पथकाच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.

पोलीस पथकाने मागावर असताना माहिती मिळाली की आरोपी राजेवाडी (ता. पुरंदर) येथे लपून बसला आहे. त्याठिकाणी तो स्वतःची ओळख लपवण्यासाठी वेशांतर करून आणि आपल्या गाडीची नंबरप्लेट बदलून पळून जाण्याच्या तयारीत होता.

 

मात्र, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता राजेवाडी गावच्या हद्दीत छापा टाकला आणि चारी बाजूंनी घेराव घालून आरोपी दत्ता उर्फ भावड्या लोंढे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची खात्रीशीर ओळख पटवून त्याला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

हडपसर विषारी दारूकांडाचा तपास राज्य पातळीवर अत्यंत संवेदनशील मानला जात असल्याने, उरुळी कांचन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ पुढील तपासासाठी सीआयडी (CID) पुणे पथकाचे प्रमुख डीवायएसपी (DySP) शामराव काळे व त्यांच्या पथकाच्या स्वाधीन केले आहे. या कारवाईमुळे विषारी दारूच्या अवैध धंद्यांचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ शिंदे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार सोमनाथ चितारे, सचिन जगताप, कमलेश होले, तसेच पोलीस शिपाई अक्षय कामठे, ऋषिकेश रासकर, संजय दाणे आणि सोमनाथ सुपेकर यांच्या पथकाने विशेष कामगिरी बजावली. उरुळी कांचन पोलिसांच्या या धडक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

नारळी पौर्णिमेला 6 राशींचं नशीब चमकणार! शुभ योगांचा महासंयोग; आज कोणावर बरसणार लक्ष्मीची कृपा?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp