Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 26 September 2026, 9:29

राहुलकुमार अवचट

यवत: गेल्या बारा दिवस दिवसांच्या गणेशोत्सव साजरा करत पारंपरिक पद्धतीने ‘गणपती बप्पा मोरया’… ‘मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात शुक्रवारी आपल्या लाडक्या बाप्पाला यवत परिसरात देखील गणरायाला निरोप देण्यात आला. सकाळी १० वाजल्यापासूनच घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू झाले होते. शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने अनेक मंडळानी सायंकाळी ५ नंतर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली .

अनेक मंडळानी डी .जे ला फाटा देत ढोल ताशा, हलगी , पारंपारिक वादन , विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावटीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. अनेक मंडळानी डी. जे मुक्त गणेश मिरवणूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डी.जे. मुक्त मिरवणूक करण्याचा निर्णय घेतला यामुळे यवत येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वत्र पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला.

गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन करीत निरोप देण्यात आला. घरोघरच्या तसेच मंडळांच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. यंदा विसर्जन मिरवणुकीत डीजेला बंदी घालण्यात आल्याने मिरवणुकीचा उत्साह कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र, कार्यकर्त्यांचा व गणेशभक्तांचा उत्साह कमी न होता पारंपरिक वाद्यांच्या, ढोल-ताशाच्या गजरात उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. अनेक मंडळानी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी,हलगी, लेझीम व पारंपरिक खेळ करीत श्री गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप दिला

 

दर वेळेस होणारा डीजेचा कडकडाट या वेळीही पहावयास मिळाला नाही यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात गणरायाला निरोप दिला. दिवसभर आखिल कदमआळी मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ, कानिफनाथ मित्र मंडळ, साई गणेश मित्र मंडळ, म्हसोबा मित्र मंडळ व्यापारी मित्र मंडळ आदी मंडळांनी आपल्या गणरायाला निरोप दिला तर रात्री अनेक वर्षांची परंपरा असलेल्या नूतन तरुण मंडळ यांच्या नेतृत्वात झालेल्या मिरवणुकीत अमर तरुण मंडळ, बाप्पा मोरया मित्र मंडळ, शिवशंभू मित्र मंडळ, हनुमान मित्र मंडळ, राजा शिव छत्रपती मित्र मंडळ, नवदीप तरुण मंडळ असे सहा मंडळे तर दुसरीकडे श्रीनाथ मित्र मंडळ यांच्या नेतृत्वात मिरवणुकीत त्रिमूर्ती मंडळ सहभागी झाली होते , नूतन तरुण मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन रात्री १०.१५ च्या सुमारास तर श्रीनाथ मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीचे रात्री ११.१५ च्या सुमारास विसर्जन करण्यात आले यावेळी महिला – मुलींने सदर केलेल्या पारंपारिक लेझीम व वादन हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

बाप्पा मोरया मित्र मंडळाच्या निर्णयाचे यवतकरांकडून स्वागत

नूतन तरुण मंडळाच्या नेतृत्वात निघालेली मिरवणूक रात्री पावणेदहाच्या सुमारास श्री काळभैरवनाथ चौकात दाखल झाली यावेळी बाप्पा मोरया मित्र मंडळ यांनी लावलेले साऊंड चालू होते याचवेळी राजा शिवछत्रपती मित्रमंडळाचे देखील साऊंड दाखल झाले यावेळी दोन्ही मंडळाचे साऊंड एकमेकांसमोर आल्याने होणारे अश्लील नृत्य, आवाजाची स्पर्धा टाळण्यासाठी बाप्पा मोरया मित्र मंडळांनी आपला साऊंड बंद करण्याचा निर्णय घेतला यावेळी घेतलेल्या निर्णयाने अनेक गणेश भक्तांनी या निर्णयाचे टाळ्या वाजून स्वागत केले.

विसर्जन घाटावर लावलेल्या दिव्याबाबत मंडळांनी मानले आभार

यवत येथील बहुतांश गणपती हे रायकर मळा जवळ असलेल्या उजव्या कालव्याकडे जात असतात या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत गणित मूर्तींचे विसर्जन केले जाते परंतु या परिसरात असलेला अंधार हा विसर्जन मिरवणुकीसाठी मोठी समस्या असतो यावर्षी यवत ग्रामपंचायतचे अधिकारी बालाजी सरवदे यांनी या परिसरात हॉलीजन दिवे लावल्याने अनेक मंडळांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14

Loni Kalbhor News : फ्लिटगार्ड कंपनीतील वादाचा राग गेटबाहेर; कामगाराला लोखंडी कड्याने मारहाण! तिघांवर गुन्हा दाखल

Saturday, 17 October 2026, 20:03

न्हावरेत मेंढपाळ महिलेने धाडसाने बिबट्याला पिटाळले; मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार…..

Saturday, 17 October 2026, 19:50
Next Post

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp