पुणे : इंदूरहून महाराष्ट्रात जाणारी एसटी बस खलघाट पुलावरून २५ फूट खाली नर्मदा नदीत पडली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला.स्थानिक जिल्हा प्रशासनाने मृतांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांश महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. तीन जण राजस्थानचे आहेत, तर एक इंदूरचा आहे. उर्वरित नऊ जण महाराष्ट्रातील आहेत. आतापर्यंत 11 जणांची ओळख पटली आहे.
चेतन गोपाल जांगीड, जयपूर (राजस्थान)
जगन्नाथ जोशी, उदयपूर (राजस्थान)
प्रकाश चौधरी, अमळनेर (महाराष्ट्र)
नीबाजी पाटील, अमळनेर (महाराष्ट्र)
कमलाबाई पाटील, अमळनेर (महाराष्ट्र)
चंद्रकांत पाटील, अमळनेर (महाराष्ट्र)
अर्वा बोरा, अकोला (महाराष्ट्र)
सैफुद्दीन पुत्र अब्बास, इंदूर (मध्य प्रदेश)
राजू मोर, रावतभाटा (राजस्थान)
अविनाश परदेशी, अमळनेर (महाराष्ट्र)
विशाल बहिरे, धुळे (महाराष्ट्र)
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारची मदत :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, राज्य सरकार पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत देणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शोक संदेश :
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही खलघाट दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील धार येथे झालेल्या बस दुर्घटनेत अनेक प्रवाशांचे नुकसान झाल्यामुळे मला खूप दुःख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.