lonikand News : (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली येथील दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी दिली.(lonikand News)
दोन सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय -२२), व टोळी सदस्य अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल, वय – २३, रा. दोघेही, रा. गाडे वस्ती बकोरी फाटा, वाघोली ता. हवेली) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.(lonikand News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघोली, बकोरी फाटा, लोणीकंद तसेच आसपासच्या भागात दहशत निर्माण करुन लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देऊन दहशत निर्माण करायचे.(lonikand News) लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणान्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातून कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये, तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने हि कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त संजय पाटील, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता, शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन दोन वर्षाकरीता तडीपार केले.(lonikand News)
दरम्यान, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनचा कार्यभार स्विकारल्यावर अवघ्या दहा दिवसात वाघोली मधील सराईत गुन्हेगार टोळीला दोन वर्षांकरीता तडीपार करून केली मोठी कारवाई, केली आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. तडीपार इसम हे पुणे जिल्ह्याचे परिसरात आढळुन आल्यास त्यांची माहीती लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर ९५२७०६९१०० यावर कळविण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी केले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.