Pune Crime News : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगवी सांडस या गावामध्ये लहान मुलांची अतिशय घृणास्पद लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दोन अल्पवयीन सख्या भावा-बहिणींना नग्न करून त्यांना एकमेकांच्या अंगावर झोपवले, आणि त्यांचे छायाचित्रण केल्याची घटना शनिवारी घडली.(sexually assaulted)
याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिसांनी स्वप्निल ढमढेरे उर्फ तात्या (वय २८) याच्या विरोधात कलम ३५४, ३५४ (अ), बाल लैंगिक अत्याचार ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.(Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी महिला हे दोघे सांगवी सांडस या गावात राहण्यात आहेस. या महिलेचा अल्पवयीन मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी हे दोघे घराच्या अंगणामध्ये खेळत होते. त्यावेळी ढमढेरे यांनी त्यांना घरामध्ये बोलावून घेतले. त्यांना त्याच्या मोबाईलमध्ये असलेले अश्लील फोटो दाखवले.
त्यानंतर मुलाला पॅन्ट काढायला लावून आरोपी स्वतः पीडित मुलीच्या अंगावर झोपून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडित अल्पवयीन मुलाला देखील बहिणीच्या अंगावर झोपवून दोघांवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.(lonikand Police Station)