लोणी काळभोर : अवैध गुटखा विक्री करणाऱ्या उरूळी कांचन (ता. हवेली) येथील मातोश्री पानश़ॉपवर लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी (ता.२) छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी ९३० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हडपसर पोलिसांनी मांजरी बुद्रुक येथील एका पानशॉपवर छापा टाकून १० हजार ८०९ रुपयांचा गुटखा जप्त केला. तर साडेसतरा नळी येथील शुक्ला पानशॉप येथून २७१७ रुपयांचा गुटखा जप्त केले आहे. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी दोघानाही अटक केली आहे.
संतोष दत्तात्रय थेऊरकर (वय-५२) उमाशंकर शिवप्रसाद गुप्ता (वय-२७ रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पुणे पोलिसांनी शहरातील फरासखाना, डेक्कन, शिवाजीनगर, समर्थ, सहकारनगर, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, वारजे, उत्तमनगर, कोथरुड, सिंहगड, चतु:श्रृंगी, चंदननगर, विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्या आणि साठा करुन ठेवणाऱ्यावर गुरुवारी छापेमारी करून कारवाई केली आहे
दरम्यान, बंदी असतानाही आरोग्यास घातक असलेल्या गुटख्यासह सुगंधी सुपारी आणि पानमसाल्याचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्याविरोधात पुणे पोलिसांनी मोहीम उघडली आहे.
पुणे शहरात गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर आणि गुटख्याचा साठा करुन ठेवलेल्या गोदामावर पुणे पोलिसांनी छापा टाकून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर ३२ जणांवर गुन्हा दाखल करुन २२ जणांना अटक केली आहे.